Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

Pune Crime : मोक्का व खुनाच्या प्रयत्नात फरार दोन आरोपींना अटक

Pune Crime : मोक्का व खुनाच्या प्रयत्नात फरार दोन आरोपींना अटक

खडकी पोलिसांची फिल्मी पाठलाग करीत ठोकल्या बेड्या

marathinews24.com

Pune Crime : मोक्का व खुनाच्या प्रयत्नात फरार दोन आरोपींना अटक – खुनाचा प्रयत्नासह मोक्काअंतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या दोघा आरोपींना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. राजेश उर्फ दाद्या नवनाथ घायाळ (रा. दादा कॉम्प्लेक्स, डॉल्फिन चौक, अपर बिबवेवाडी) आणि करण उर्फ कर्‍या सुरेश जाधव (रा. पड्याळ वस्ती, बोपोडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना चार तासात बेड्या – सविस्तर बातमी 

फरार आरोपींचा तपास करण्याचे आदेश सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांनी खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे यांनी पथकाची बैठक घेऊन आरोपींची शोधमोहिम निश्चीत केली. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अनिकेत भोसले यांनी तांत्रिक कौशल्य वापरून आरोपींचे मोबाईल क्रमांक मिळवले. त्यानंतर त्यांच्या दैनंदिन हालचालींचा सखोल अभ्यास केला गेला. आरोपींनी अनेकदा ठिकाणे बदलून पोलीसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करीत होते.

पोलीस अमलदार आबा केदारी, सुधाकर राठोड, ऋषिकेश दिघे यांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. मात्र आरोपींनी पोलीसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून दोन्ही आरोपींनी पलायन करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी हार न मानता, अतिशय शिताफीने आणि धाडसाने सुमारे दोन किलोमीटर आरोपींचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेत अटक केली. आरोपींना अटक केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांनी खडकी पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक केले आहे. ही कामगिर खडकी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकासाठी गौरवास्पद असून, दक्षता, धाडस, तांत्रिक कौशल्यासह टीमवर्क अत्यंत कौतुकास्पद आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×