Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

Pune Crime : सराइताकडून तीन पिस्तुलांसह काडतुसे जप्त

Pune Crime : सराइताकडून तीन पिस्तुलांसह काडतुसे जप्त

बाह्यवळण मार्गावर गुन्हे शाखेची कारवाई 

marathinews24.com

Pune Crime : सराइताकडून तीन पिस्तुलांसह काडतुसे जप्त- देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराइताला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीच्या तीन पिस्तुलांसह सहा काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ही कारवाई करण्याात आली.चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २७, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग परिसरात गस्त घालत हाेते. त्या वेळी वडगाव बुद्रुक परिसरात सराइत गुन्हेगार शेखर ठोंबरे थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी दयानंद तेलंगे-पाटील यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीची तीन पिस्तुले, तसेच सहा काडतुसे सापडली. तो पिस्तुलांची कोणाला विक्री करणारा होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

त्याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस कर्मचारी प्रवीण उत्तेकर, विनायक साळवे, दयानंद तेलंगे-पाटील, सर्जेराव सरगर, सचिन माळवे, संदीप शिर्के, मारुती पारधी, विशाल दळवी यांनी ही कारवाई केली.

कोयता बाळगणारे गजाआड 

Pune Crime : कोयता बाळगणाऱ्या सराइतांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. यश दीपक घोडके (वय १९, रा. म्हस्के चाळ, कात्रज), देवेश विष्णू काळे (वय २०, रा. नवीन वसाहत मंदिराजवळ, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. घोडके सराइत असून, दागिने हिसकाविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्याने जामीन मिळविला आहे. घाेडके याच्याकडे कोयता असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमित गद्रे आणि दत्तात्रय पवार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. चौकशीत घोडके याने साथीदार काळे याच्यासोबत गु्न्हा केल्याची माहिती मिळाली. काळे याला ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, वर्षा कावडे आणि पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×