Pune Crime : तर खुनाचा गुन्हा उधळून लावता आला असता….वनराज आंदेकर खूनातील आरोपीच्या मुलाचा खून

Ayush Komkar Crime

ऐन गणेशोत्सवात पुण्यात टोळीयुद्धाचा भडका

marathinews24.com

पुणे : Pune Crime – माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष याचा शुक्रवारी सायंकाळी नाना पेठेत बेछूट गोळीबार करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.५) रात्री पावणे आठ वाजता घडली. मात्र, जर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेळीच तपास करून आरोपींना अटक केली असती तर खुनाचा गुन्हा टळला असता. काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलिसांनी आंबेगाव पठार परिसरात ताब्यात घेतलेल्या आरोपीने आंदेकर खुनातील सोमनाथ गायकवाड याच्या घराची रेकी केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे गुन्हे शाखेने जर अटकेत असलेल्या आरोपीकडून व्यवस्थित माहिती घेऊन तपास केला असता, तर आयुश कोमकर याचा खून झाला नसता, हे स्पष्ट झाले आहे.

दहशतीसाठी पिस्तूल बाळगणार्‍याला अटक; पर्वती पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी 

गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर (वय २०, रा. हमाल तालीमजवळ, नाना पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पसार झालेल्या हल्लेखोरांविरुद्ध रात्री उशीरा समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वैमनस्यातून १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावर गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून खून केला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक केली होती.

नाना पेठेतील लक्ष्मी काॅम्प्लेक्स सोसायटीत आयुष राहायला होता. शुक्रवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास आयुष दुचाकीवरुन सोसायटीत आला. आयुष तळमजल्यावर दुचाकी लावत होता. त्या वेळी आरोपी तेथे दबा धरून बसले होते. आरोपींनी पिस्तुलातून आयुषवर बेछूट गोळीबार केला. आरोपींनी एकूण ११ गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या आयुषला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले.

टोळीयुद्धातून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. घटनेची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी नाना पेठेतील हमाल तालीम परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर याच्यावर बेछूट गोळीबार करुन खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे.

आंदेकर टोळीने पुणे पोलिसांना दिला चकवा

आंदेकर टोळीने वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्याचा कट रचल्याचे नुकतेच उघडकीस आले. धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दूधभाते राहायला आहेत. आंदेकर टोळीने गायकवाड आणि दूधभाते यांच्या निकटवर्तीयांवर पाळत ठेवली होती. भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखेने कारवाई करून एकाला अटक केली होती. याप्रकरणी कृष्णा आंदेकर, दत्ता बाळू काळे, यश मोहीते, अमन पठाण, यश पाटील, सुजल मिरगु, अमित पाटोळे, स्वराज वाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गायकवाड आणि दुधभाते यांच्या निकटवर्तीयांवर पाळत ठेऊन खून करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले. प्रत्यक्षात मात्र, आंदेकर टोळीने विसर्जनाच्या पूर्वसंध्येला प्रतिस्पर्धी टोळीतील मुख्य आरोपीच्या मुलाचा खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. आंदेकर टोळीने पोलिसांची चकवा दिला आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×