Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

Pune Crime : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूकीत हातसफाई

Pune Crime

मोबाइल चोरणारे दोघे अटकेत, १३ मोबाइल जप्त- फरासखाना पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – Pune Crime : गणपती विसर्जन सोहळ्यात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे मोबाइल चोरणार्‍या दोघांना चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ७८ हजारांचे १३ मोबाइल जप्त केले आहेत. अलीम मुस्ताक शेख (वय २६ रा. गल्ली नं. ६ समोर, मालेगांव जिल्हा नाशिक) आणि अत्तर अहमद एजाज अहमद (वय २५ रा. मुस्लीमनगर, बी- गल्ली नं. पाच, बडे कब्रस्थान जवळ, मालेगाव नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कौटुंबिक वादातून ८० वर्षीय आईवर चाकूने वार – सविस्तर बातमी 

शहरात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शनिवारी ( दि.७) बेलबाग चौक, लक्ष्मी रोड, बुधवार चौकात मोठ्या प्रमाणावर भाविक थांबले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी ७ सप्टेंबरला रात्री अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराच्या खिशातील मोबाइल चोरून नेला होता. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी तपासी अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे यांना आरोपींचा शोधण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस अमंलदार तानाजी नांगरे व गजानन सोनुने यांनी गर्दीतून दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी पासोड्या विठोबा मंदीराजवळून आरोपी अलीम मुस्ताक शेख आणि अत्तर अहमद एजाज अहमद यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातुन १३ महागडे मोबाइल जप्त केले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले, एसीपी अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक उत्तम नामवाडे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, एपीआय वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, महेबुब मोकाशी, कृष्णा निढाळकर तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, महेश पवार, चेतन होळकर, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, प्रशांत पालांडे, सुमित खुट्टे, शशीकांत ननावरे, वशिम शेख, मनिषा पुकाळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×