Breking News
Savitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : कोथरुडमधील रजपूत वीटभट्टी परिसरातील मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी

पुणे : कोथरुडमधील रजपूत वीटभट्टी परिसरातील मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी

८ मीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण होऊन झाला १२ मीटर – ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा

marathinews24.com

पुणे : कोथरुडमधील रजपूत वीटभट्टी परिसरातील मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी – कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत असून, कोथरुडमधील एरंडवणे येथून नदीपात्रातील रस्त्या मार्गे शहरात जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रजपूत वीटभट्टी परसरातील रस्ता प्रशस्त झाला आहे. त्यामुळे सदर भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे.

अल्पसंख्यांकांच्या प्रश्नावर राजकीय व सामाजिक पातळीवर संयुक्त लढणार – माजी मंत्री आरीफ नसीम खान – सविस्तर बातमी 

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती. मतदारसंघतील मिसिंग लिंकचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत सातत्याने बैठका घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यामुळे गतीमान झालेल्या महापालिकेने मिसिंग लिंकमधील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात रजपूत वीटभट्टी परिसरातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भागातील ८ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन हस्तांतरण होऊन रस्याचे रुंदीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे.

त्यामुळे ८ मीटरच्या रस्ता १२ मीटर झाला असून, सदर रस्ता वाहतुकीसाठी अतिशय प्रशस्त झाला आहे. त्यामुळे कोथरुडकरांची मोठी सोय झाली आहे. हा प्रलंबित प्रश्न सोडविण्यामध्ये महापालिका प्रशासन, स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक यांची मोलाची साथ मिळाल्याबद्दल नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच, उर्वरित टप्प्यातील रस्त्याचे रूंदीकरण लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×