आंबेगाव, चंदननगर, बालेवाडीत गुन्हे उघड
marathinews24.com
पुणे – शहरात तीन ठिकाणी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांना तीन गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. आंबेगाव खुर्द, चंदननगर, बालेवाडी येथील दरोड्याच्या तयारीचे गुन्हे पोलिसांनी रोखताना तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे. पहिल्या गुन्ह्यात तपडीपारीत असताना आपल्या साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेलया टोळक्यातील तिघांना आंबेगाव पोलिसांनी जांभुळवाडी तलावा जवळुन 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री बेड्या ठोकल्या. यावेळी टोळीतील दोघेजण पळून गेले.
मंदिरातील दानपेटी फोडली, ५० हजारांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी
प्रथमेश उर्फ अभय देविदास कुडले (24, रा. गणेश कूलनी, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव), राहुल नागेश माने (29, रा. सिध्दीविनायक सोसायटी, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) आणि प्रशांत दत्तात्रय माने (रा. गायमुख चौक, आंबेगाव बुद्रुक, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर पृथ्वीराज कांबळे, अणि करण पटेकर यावेळी पसार झाले. याबाबत पोलिस शिपाई राकेश अशोक टेकवडे (39) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रथमेश कुडले यााला दोन वर्षासाठी शहरातून तडीपार केले असताना त्याने दरोडा टाकण्यासाठी टोळी तयार केल्याचे या गुन्ह्याच्या निमित्ताने समोर आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
चंदननगर येथे सराईतासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यावेळी तीघेजण पसार झाले. सराईत गुन्हेगार आकाश आनंद बेत्ती (20, बीडी कामगार वसाहत, चंदननगर), अमोल वसंत चोरघडे (23, रा. राजश्री कॉलनी, वडगावशेरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश संजय शिरसाठ, साहिल शकील सय्यद, आकाश भरत पवार या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई ज्ञानोबा लहाने यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार ओम साई कृपा वॉशिंग सेंटरच्या शेजारी पत्र्याच्या शेडजवळ बोळात घडला. वरीष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मागर्दनाखाली ही कारवाई करण्यात आली.
बालेवाडीत अल्पवयीन टोळक्याकडून दरोड्याचा प्रयत्न
बालेवाडी येथील साई चौकातील भाजी मंडई येथे मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत थांबलेल्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्याला बाणेर पोलिसांनी ताब्यात घेतले. तर यातील एक जण पळून गेला. यावेळी त्याच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडल्यानंतर पोलिस शिपाई कृष्णा हनुमंत तोरडमल यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















