Breking News
Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेत

Pune : रोटरी क्लब, पाषणच्या अध्यक्षपदी प्राजक्ता जेरे यांची निवड

Pune : रोटरी क्लब, पाषणच्या अध्यक्षपदी प्राजक्ता जेरे यांची निवड

पाषाणच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी प्राजक्ता जेरे यांची निवड

marathinews24.com

Pune : रोटरी क्लब, पाषणच्या अध्यक्षपदी प्राजक्ता जेरे यांची निव – रौप्यमहोत्वात पदार्पण करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ पुणे, पाषाणच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी प्राजक्ता जेरे यांची निवड करण्यात आली आहे. 2025-26 या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ डेक्कन येथील पी. वाय. सी. हिंदू जिमखाना येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी प्रांतपाल रवी धोत्रे, आजी प्रांतपाल नितीन ढमाले, सह प्रांतपाल स्वाती मुळ्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. क्लबचे मावळते अध्यक्ष अमित भदे, मावळते सचिव विनायक गुळवणी मंचावर होते.

‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन – सविस्तर बातमी 

अमित भदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष प्राजक्ता जेरे यांच्याकडे सुपूर्त केली. नूतन कार्यकारिणीत दीपा पानसे (सेक्रेटरी), सचिन आमडेकर (ट्रेझरर), विनायक गुळवणी (डायरेक्टर ॲडमीन), संजय देशपांडे (डायरेक्टर मेंबरशीप), अवनी धोत्रे (डायरेक्टर फाऊंडेशन), प्रसाद शिवरकर (डायरेक्टर पब्लिक इमेज), अभिजित वाणी (डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट नॉन मेडिकल), अमित भदे (डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट मेडिकल), स्नेहा कुलकर्णी (डायरेक्टर न्यू जनरेशन), केतकी आमडेकर (क्लब आयटी ऑफिसर), विवेक मुळे (जॉईंट सेक्रेटरी), हेमंत जेरे (क्लब ट्रेनर), दयानंद पानसे (डायरेक्टर फंड रेझिंग) यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष प्राजक्ता जेरे म्हणाल्या, रोटरी क्लब, पाषणच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. भविष्यात आरोग्य, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात सर्वांना एकत्र घेऊन कार्य करण्याचा मानस आहे.
रवी धोत्रे यांनी रोटरी क्लब पाषाणच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून नूतन कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

नितीन ढमाले म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. क्लबचे सदस्य तसेच देणगीदार यांच्यातर्फे मिळणारी मदत गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी रोटरी क्लब पाषाण सदैव जागरूक असतो. कामात पारदर्शकता राखून समाजकार्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

रोटरी क्लब, पाषाणचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्या समिहन धर्माधिकारी, राजन कुलकर्णी, नेहा आपटे, स्मिता कुलकर्णी, भक्ती ढोरे तसेच संस्थेस सहकार्य करणारे अमित भदे, अमेय धोत्रे, हेमंत जेरे, सचिन आमडेकर, विनोद श्रीवास्तव यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन अवनी धोत्रे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×