दहशत माजविणार्या दोघांना बेड्या, युनीट तीनची कामगिरी
marathinews24.com
पुणे – तरूणाला अरेरावी करुन आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही. असे म्हणत हत्यार हवेत फिरवून दहशत माजविणार्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट तीनने अटक केली आहे. ही घटना नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. अनुराग संभाजी दारवटकर (वय २८ रा. नांदेडगाव पुणे आणि विजय अशोक तारू (वय २२ रा. नांदेडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.त्यांच्यावर नांदेडसिटी पोलीस स्टेशन गु.र.नं.७१ /२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा क ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
स्वारगेट एसटी स्टँडमध्ये महिलेचे दागिने चोरले…सविस्तर बातमी
हातामध्ये लोखंडी हत्यार घेउन सार्वजनिक रोडवर मोठमोठयाने आरडाओरडा करत दोघांनी नागरिकांमध्ये दहशत माजविली होती. आम्हीच इथले भाई आहेत, कोणी नादाला लागायचे नाही असे म्हणत धमकाविले होते. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशनकडील सी आर मोबाईलवरील पोलीस अंमलदार हद्दीमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. त्यावेळी चालक पोलीस अंमलदार संभाजी कोंढावळे, दिनेश झोळे, दिपक सपकाळ हे २१ एप्रिलला रात्रौ शिवणे नांदेड रोडवरून नांदेड गावातुन येत होते. त्यावेळी शिवशंकर अमृततुल्य हॉटेलमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अनुराग संभाजी दारवटकर आणि विजय अशोक तारू नाव सांगितले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस अंमलदार संभाजी कोंढावळे, दिनेश झोळे दिपक सपकाळ यांनी केली.