कसबा पेठेतील घटना
marathinews24.com
पुणे – Pune Crime : शहरातील मध्यवर्ती कसबा पेठ परिसरात बसस्थानकात थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना २९ जूनला संध्याकाळी चारच्या सुमारास शनिवार वाड्यासमोरील बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी चिंचवड परिसरात राहणार्या ५० वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेअर ट्रेडींग परताव्याचे आमिष पडले महागात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला चिंचवडमध्ये राहायला असून, २९ जूनला संध्याकाळी चारच्या सुमारास कसबा पेठेतील बसस्थानकात गाडीची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी परिसरात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रूपये िंकमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. काही वेळानंतर महिलेला गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. पोलीस अमलदार निंबाळकर तपास करीत आहेत.
पीएमपीएल बसप्रवासात महिला टारगेट
पीएमपीएल बसने प्रवास करणार्या महिलांना लक्ष्य करून चोरटे हात साफ करीत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. विशेषतः गर्दीचा फायदा घेत सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास महिलांचा ऐवज चोरून नेला जात आहे. जेष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची पाटली कापून नेणे, गावाहून आलेल्या महिलांवर लक्ष ठेउन त्यांच्या ऐवजाची चोरीच्या अनेक घटना यापुर्वीही घडल्या आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांसह पीएमपीएल प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचेही दिसून आले आहे.
कोंढव्यात घरफोडी, २ लाखांचा ऐवज चोरीला
Pune Crime : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख १३ हजारांची रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून २ लाख २ हजार रूपयांची चोरी केली आहे. ही घटना २९ जूनला कोंढव्यातील भाग्योदयनगरात लब्बेक रेसीडेन्सीमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटूंबियासह कोंढव्यातील भाग्योदयनगरात लब्बेक रेसीडेन्सीमध्ये राहायला आहेत. २९ जूनला त्यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील १ लाख १३ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. बाहेरून आल्यानंतर तक्रारदाराला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कोंढवा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नाळे तपास करीत आहेत.