Breking News
अमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी पुढे यावे- पोलिस आयुक्त अमितेश कुमारराज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्यामतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वितपुण्यात ठेकेदाराकडे मागितली ३७ लाखांची खंडणीकौशल्य प्रशिक्षणामुळे युवक आत्मनिर्भर बनतील – डॉ. बबन जोगदंडगणना अर्जांच्या डिजिटायझेशनमध्ये राजकीय पक्षांनी सक्रिय भूमिका घ्यावीपुण्यात मिशन क्रॅकडाउनचा गुंडांना तडाखा बसणारह.भ.प. उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते लोणी देवकर एमआयडीसी येथे वृक्षारोपणजगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानंतर बारामतीत स्वच्छता मोहीम

‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’ मोहिमेचा शुभारंभ

‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’ मोहिमेचा शुभारंभ

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दाखवला हिरवा झेंडा

marathinews24.com

पुणे – गोवा राज्य सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’च्या वाहनाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हिरवी झेंडी दाखवून मोहिमेला शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी राधाकिसन देवढे उपस्थित होते.

कौशल्य विकास प्रशिक्षणातून दिव्यांगांसाठी रोजगार निर्मिती – सविस्तर बातमी 

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि संयुक्त राष्ट्र संघ भारतातील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्य सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ सोहळ्याचे ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पणजी, गोवा येथे आयोजन करण्यात येणार आहे.

सोहळ्याला अधिक समावेशक स्वरूप देण्यासाठी कानपूर येथील सुनील मंगल यांच्या नेतृत्वाखाली ‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’ या विशेष मोहिमेचे कानपूर येथून आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत ग्वाल्हेर आणि चंदीगड येथूनही दोन वाहने सहभागी झाली आहेत.

दिव्यांग व्यक्तीच्या क्षमतांचा सन्मान करण्यासाठी, तसेच त्यांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांना एकत्र आणून या माहिमेला सर्व नागरिकांनी, संस्था, व्यावसायिक संस्था आणि सामाजिक संस्थांनी पाठिंबा देण्याकरिता ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ आयोजित केला जातो. यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×