Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ऑगस्टमध्ये

पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ऑगस्टमध्ये

स्पर्धेचे अर्जवाटप दि. १४ ते १५ जुलैला होणार

marathinews24.com

पुणे – पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ऑगस्टमध्ये – महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हीरक महोत्सवात पदार्पण करीत असलेल्या स्पर्धा दि. 10 ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत होणार आहे. स्पर्धेचे अर्जवाटप दि. 14 व दि. 15 जुलैला सायंकाळी 6 ते 8 या वेळात संस्थेच्या सुभाष नगरमधील कार्यालयात होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज दि. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळात नातू वाडा, 418 शनिवार पेठ येथे जमा करायचे आहेत.

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १३ जुलैला आयोजन – सविस्तर बातमी 

स्पर्धेचे लॉटस्‌ दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ येथे काढण्यात येणार आहेत. दि. 10 ते 24 ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धा होणार आहे. अंतिम फेरी दि. 13 व दि. 14 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 19 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रीय कलोपासक आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूर देसाई यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राजाभाऊ नातू स्मृतिदिनानिमित्त ‌‘महापूर‌’चा प्रयोग

महाराष्ट्रीय कलोपासकचे माजी चिटणीस कै. राजाभाऊ नातू यांच्या 31 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सतीश आळेकर लिखित ‌‘महापूर‌’ या नाटकाचा प्रयोग शुक्रवार, दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रयोग सर्वांसाठी खुला असून प्रवेशिका आवश्यक आहे. ऋषी मनोहर दिग्दर्शित या नाटकात आरोह वेलणकर, प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार, दिलीप जोगळेकर यांच्या भूमिका आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×