Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेवर अत्याचाराचा प्रयत्न

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – शिक्षणाचे माहेरघर असलेल्या शहरात धक्कादायक घटना घडली असून, स्वतः चा मुलगा लैगिंकदृष्ट्या सक्षम नसल्याने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यानेच सूनेवर अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताविरुद्ध सहकारनगर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्तासह त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जेष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलाचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. पीडित महिलेचा आरोपीच्या मुलाशी विवाह झाला होता. त्यावेळी मुलगा लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याची बाब महिलेपासून लपवून ठेवण्यात आली होती. विवाहानंतर त्यांना मुलं होत नव्हते. मुलं होण्यासाठी सासऱ्याशी संबंध ठेवावेत, असा दबाब सासू आणि पतीने टाकला होता, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला.

तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. २३ जूनला महिला एकटी घरात असताना सासऱ्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने विराेध केल्यानंतर सासऱ्याने पद आणि ओळखीची भीती दाखविली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकारानंतर घाबरलेली महिला माहेरी निघून आली. तिने याबाबत नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सूनेने पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती मिळाल्यानंतर निवृत्त सहायक पोलीस आयुक्त, त्यांची पत्नी आणि मुलगा घर बंद करुन पसार झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×