Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुणे जिल्ह्यातील गाजलेल्या प्रकरणांचा उलगडा…

पुणे जिल्ह्यातील गाजलेल्या प्रकरणांचा उलगडा...

दोन अत्याचारासह दिवसा घरफोडी गुन्ह्यांची उकल

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्यातील गाजलेल्या प्रकरणांचा उलगडा… – लैंगिक अत्याचारातील दोन गुन्हयातील अज्ञात आरोपींना चोवीस तासांचे आत पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यापैकी लोणावळ्यात पायी चाललेल्या तरूणीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित तरूणीने मोटारीत सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, तपासाअंती एका आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच आंतरजिल्हा दरोडेखोरांचे टोळीला अटक करून घरफोडी चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

गृहप्रकल्पाच्या खड्डयात पडून मजुराचा मृत्यू; तळजाई परिसरातील घटना; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पिडीत तरूणी २५ जुलैला रात्री साडेनउच्या सुमारास नारायणधाम रोडने तुंगार्ली रोडने पायी जात होती. त्यावेळी पांढर्‍या रंगाच्या वाहनातून आलेल्या तीन इसमांनी तिला गाडीत बसवून सामूहिक अत्याचार केल्याची तक्रार लोणावळा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. लोणावळा परिसरात १० दिवसांत दोन तरूणीवर अत्याराच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी लोणावळा आणि एलसीबी पथकाची बैठक घेतली. गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. तपासादरम्यान पिडीतेवर एकाच व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला असून, सनील वसंत गायकवाड (वय ३५ रा. तुंगार्ली ता. लोणावळा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्यानेच कारमध्ये बसवून नेले असल्याचे उघडकीस आले.

लोणावळ्याच्या हद्दीत पीडित महिला १५ जुलैला गावाकडून खडक घेवंडे गावाचे दिशेने जाणारे रोडने एकटीच पायी जात होती. दुपारी दोनच्या सुमारास पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अनोळखाने तिला अडवून लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडीतेने तक्रार नोंदविली होती. पथकाने परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु दुर्गम भाग असल्याने सीसीटीव्हीचा अभाव होता. याप्रकरणी आरोपी बाळु दत्तू शिर्वेâ (वय ३५ रा. जवन नं. ३, ता. मावळ, जि. पुणे ) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला तपासकामी लोणावळा ग्रामीण पोलीसांचे ताब्यात देण्यात आले असून सदरचा आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडी रिमांडमध्ये येरवडा जेल मध्ये आहे.

भरदिवसा दरोडा टाकणार्‍या टोळीला अटक, १९ गुन्हे उघडकीस

बोरीबेल ता. दौंड गावात टोळक्याने ११ जूनला दुपारी एकच्या सुमारास एकाच्या घरी दरोडा टाकला होता. ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत (वय ४१) हे पत्नी व मुलांसह घरी असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी साडेतीन लाखांची जबरी चोरी केली होती. भर दिवसा दरोडा पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. संबंधित गुन्हा सराईत आरोपी अटल्या ईश्वर भोसले, सचिन भोसले, गहीनीनाथ भोसले (सर्व रा. बेलगाव ता.कर्जत जि. अहिल्यानगर) यांनी केल्याची माहिती पथकाला मिळाली. संशयित आरोपी मोटार सायकलवरून सिद्धटेक ते दौंड असे जात आहेत. अशी माहिती मिळाल्याने पथकाने शिरापूर परिसरात सापळा लावून तिघानांही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७१ हजारांचे दागिने, दुचाकी असा ऐवज जप्त केला. गुन्हा करताना मिलन उर्फ मिलिद ईश्वर भोसले , धोंडया उर्फ युवराज ईश्वर भोसले , सोन्या ईश्वर भोसले (सर्व रा.बेलगाव ता. कर्जत ) सोबत असल्याचे सांगितले.

दरोडयाचे गुन्हयात अटक करणेत आलेल्या तीन आरोपी व पाहिजे आरोपी विरोधात पुणे, सोलापुर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बुलढाणा, बीड, साता जिल्हयामध्ये यापुर्वीचे दिवसा घरफोडयाचे सुमारे ६० गुन्हे दाखल आहेत. ते सराईत असून आंतरजिल्हा गुन्हेगारी टोळी चालवितात. सदर आरोपींची टोळी पकडणेत आल्याने दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे घडण्याचे प्रमाणात घट झाली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अपर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×