Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

पूरग्रस्तांसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट धावली; दिला १ कोटींचा निधी

पूरग्रस्तांसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट धावली; दिला १ कोटींचा निधी

‘मुख्यमंत्री सहायता निधी‘साठी १ कोटी रुपयांच्या धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द 

marathinews24.com

पुणे – मानव सेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ‘मुख्यमंत्री सहायता निधी‘साठी १ कोटी रुपयांच्या धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. तर, सुवर्णयुग सहकारी बँकेकडून २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला हा मदतीचा हात देण्यात आला.

पुरग्रस्तांसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठान धावले; मुख्यमंत्री सहायता निधीला दिली ५१ हजारांची मदत – सविस्तर बातमी 

मुंबईत धनादेश सुपूर्द करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह कार्याध्यक्ष सचिन आखाडे, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी, तुकाराम रासने उपस्थित होते.

ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने म्हणाले, आपला शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून सर्वांना अन्नधान्य पुरवतो. कोरोनासारख्या संकटातही खंबीरपणे उभा राहिलेला बळीराजा आज अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालदिल झाला आहे. या संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तो पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या माध्यमातून कोयना, लातूर भूकंप सारख्या आपत्तीच्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत यांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वेळोवेळी मदत देत ट्रस्टने संवेदना दाखविली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×