निशा फाऊंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम
marathinews24.com
पुणे – दिवाळीच्या निमित्ताने निशा फाऊंडेशन, सांगली यांच्यावतीने रविवारी ( दि.१९) विधवा आणि जेष्ठ ३०० महिलांसाठी साडी वाटप करण्यात आले. सणामध्ये संबंधित महिलांनाही आनंद मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून साडी वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून पूजा विशाल पाटील, योगेश गिडवाणी, शेवंताताई वाघमारे, सुरेश जाधव , प्रा. परशुराम रणधीर उपस्थित होते. मान्यवरांनी महिलांशी संवाद साधत समाजात स्त्रियांच्या सन्मानाचे आणि स्वावलंबनाचे महत्व पटवून दिले.

नागरिकांनो दिवाळीला गावी चाललाय…घरांची सुरक्षितता वाढवा – सविस्तर बातमी
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी निशा फाऊंडेशन यांच्यावतीने साडी वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “साडी हा फक्त वस्त्र नाही, तर सन्मान आणि आदराचे प्रतीक आहे. समाजातील प्रत्येक महिलेला आदराने, सन्मानाने जगण्यासाठी प्रेरणा देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. उपक्रमातून महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या प्रतिनिधींनी केले. तर उपस्थित मान्यवरांनी सेवाभावातून कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष मुजफ्फर लगीवाले, निशा फाउंडेशनचे राहुल घाडगे, अविनाश वडर, विशाल मद्रासी, अर्जुन सूर्यवंशी, आकाश मानकर, शाम मजले, किरण गुळवे, ओंकार साळुंके, रोहित कांबळे, सुनिल कांबळे, नितीन साबळे उपस्थित होते.





















