Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे व निविष्ठा वेळेत उपलब्ध

बारामती तालुका कृषी अधिकाऱ्यांची माहिती

marathinews24.com

बारामती – खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल व तुर पिकांची बियाणे वेळेत उपलब्ध झाली आहेत. तालुक्यातील चारही मंडळांमार्फत शेतकऱ्यांना वितरण करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना ही बियाणे वेळेत मिळाल्याने नियोजनबद्ध पेरणी करता आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली आहे. बियाणे प्रकल्पाचा लाभ फक्त १० हेक्टरपर्यंत मर्यादित असून संपूर्ण गावांना बियाणे वाटप करता येत नाही. हे बियाणे शेतकरी गटांनाच उपलब्ध करून देण्यात आले असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

बालसाहित्यात वैज्ञानिक मांडणीला अधिक महत्त्व- डॉ. सदानंद मोरे – सविस्तर बातमी

बियाण्यांबरोबरच जैविक निविष्ठा व बीज प्रक्रिया साहित्य देखील वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या गोदामांमध्ये किटक सापळे थोडे उशिरा प्राप्त झाले असले तरी तेही नियोजनबद्ध पद्धतीने चारही मंडळांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आले आहेत. खरीप हंगामातील सर्व प्रकल्पांतर्गत बियाणे व निविष्ठा वाटप पूर्ण झाले असून त्याची नोंदवही अद्ययावत करण्यात आली असल्याचेही हाके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×