Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पाेलिसांकडून कारवाईची (डिजिटल ॲरेस्ट) भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्ज फेडण्यासाठी सोनारच कारागिर बनला दरोडेखोर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे मुंढवा भागात राहायला आहे. सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे सांगून या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याची बतावणी सायबर चोरट्याने त्यांच्याकडे केली. या प्रकरणात अटक (डिजिटल ॲरेस्ट) करण्यात येणार असल्याची भीती सायबर चोरट्याने दाखविली. ज्येष्ठ नागरिकाला तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्याच्या खात्यात साडेतीन लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×