Breking News
राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणारपरीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवातदिल्ली स्फोटचे पुणे कनेक्शनचा कॉल; तपासात सत्य वेगळेचवेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा दलालावर एमपीडीएची कारवाईधर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी !जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते बारामती विधानसभा मतदार संघाकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्धमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात गुटखा तस्करांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्तपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आवाहनरामटेकडीत आम्हीच भाई; शस्त्रधारी दोघांचा राडा

पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन

हदयविकाराच्या धक्क्याने निधन

marathinews24.com

पुणे – लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार (वय ५०) यांचे मध्यरात्री हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सर्जेराव कुंभार हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे गावाचे रहिवासी होते. कुंभार हेविमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षक म्हणून नियुक्तीस होते. गेल्या वर्षी त्यांची लोणीकंद पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मुख्य सचिवांनी घेतला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा आढावा – सविस्तर बातमी

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. १ जानेवारी रोजी पार पडलेल्या अभिवादन सोहळ्याचा बंदोबस्त कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडला होता. शनिवारी (दि. ३१ जानेवारी) दिवसभर ते पोलीस ठाण्यात होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ते कामकाज आटोपून वडगाव शेरीतील घरी गेले. मध्यरात्री दोनच्या सुमारास अस्वस्थ वाटून लागले. त्यानंतर त्यांना तातडीने खराडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल असताना त्यांना हदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचे निधन झाले असून, त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×