Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन

सरकारच्या चुका व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा निषेध म्हणून आंदोलन 

marathinews24.com

पुणे– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पुणे शहराच्यावतीने कसबा गणपती येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या चुका व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी “एक पेढा भ्रष्टाचाराचा, एक पेढा मत चोरीचा, एक पेढा खड्ड्यांचा, एक पेढा महागाईचा” अशा घोषणा देत पेढे आणि गाजर वाटले.आंदोलनाची सुरुवात कसबा गणपतीची आरती करून करण्यात आली. यावेळी “मोदींना सुबुद्धी मिळावी आणि देशाचे भले व्हावे” अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त अभिवादन – सविस्तर बातमी 

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, भाजप ही जुमला पार्टी बनली असून मतदारांची फसवणूक झाली आहे. देशात महागाईने उच्चांक गाठलेला आहे, पुणेकर खड्ड्यांनी हैराण आहेत, मत चोरी सुरू आहे आणि भ्रष्टाचारी आमदार सत्तेचा मलिदा खात आहेत. ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ ही घोषणा फसवी ठरली आहे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदींनी सत्तेवरून पायउतार व्हावे हीच आमची मागणी आहे.”
आंदोलनाला शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख गजानन थरकुडे, भरत कुंभारकर, प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, कार्यालयीन सचिव मकरंद पेटकर, संघटक राजेंद्र शिंदे, किशोर रजपूत संदीप गायकवाड, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण राजेश मोरे चंदन साळुंखे हेमंत यादव निलेश वाघमारे नंदू येवले संतोष भुतकर अनिल परदेशी गिरीश गायकवाड रुपेश पवार दत्ता घुले ज्ञानंद कोंढरे शैलेश जगताप विकी धोत्रे नागेश खडके विलास कथलकर रमेश परदेशी सूर्यकांत पवार अमोल घुमे सचिन चिंचवडे जुबेर शेख नितीन निगडे पंढरीनाथ कांबळे अभिषेक जगताप हरिश्चंद्र सपकाळ संदीप महापदी विजय रावडे नितीन रावळेकर विकास राऊत बाळासाहेब गरुड सोनू पाटील अंकित अहिरे अनिल जाधव राहुल शेडगे बकुळ दाखवे, पंकज बरीदे अमित जाधव जितेंद्र निजामपूरकर हर्षद बडगुजर प्रमोद गाढवे उपस्थित होते.

तसेच युवा सेनेचे शहर संघटक सनी गवते सोहम जाधव परेश खांडके चिंतामण मुंगी अक्षय रावळ मिरज नांगरे सुरेश आढाव, महिला आघाडीच्या पद्मा सोरटे निकिता मारटकर स्वाती कथलकर अमृत पठारे सुनिता खंडाळकर जयश्री भंडगे रोहिणी कोल्हाळ वैशाली दारवटकर विजया मोहिते रोहिणी मडोळे मृण्मयी लिमये स्मिता पवार महिला आघाडी व युवा सेनेचे कार्यकर्ते तसेच शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक पेढा भ्रष्टाचाराचा… एक पेढा महागाईचा… जनता हैराण, मोदींनी पायउतार व्हावं” ही आंदोलनाची मुख्य मागणी होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×