Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन

खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, या हेतूने स्पर्धेचे आयोजन

marathinews24.com

पुणे – सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे १ ते १० ऑगस्ट कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, माजी आमदार विनायक निम्हण यांनी हयात असताना आपल्या वाढदिवसानिमित्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत होते. आता तीच परंपरा यापुढे कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गुणवंत खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

नागरिकांना सुलभ, सहज सेवा मिळाव्यात या दृष्टीने १५० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम यशस्वी करा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार – सविस्तर बातमी

सनी निम्हण म्हणाले , योनेक्स सनराइज सोमेश्वर करंडक 2025 राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून 424 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा द लाईफ स्पोर्ट्स, सोमेश्वरवाडी पाषाण या ठिकाणी 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीत रंगणार आहे. राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 9, 11, 13, 15, 19 वर्षाखालील मुले व मुली, पुरुष व महिला एकेरी व दुहेरी या गटात पार पडणार आहे. याशिवाय कै. आमदार विनायक निम्हण मेमोरियल एक दिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे.

हि बुद्धिबळ स्पर्धा 8, 10, 12 व 15 वर्षाखालील गटात पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण एक लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असल्याचे सनी निम्हण यांनी नमूद केले.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते सनी निम्हण यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा पुण्यात होत आहे.गतवर्षी देखील या ठिकाणी पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला खेळाडूंकडून भरघोस प्रतिसाद लावला होता. यावर्षी ही स्पर्धा 8 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी रंगणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×