Breking News
Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सून का लांबणीवर जातोय…कधी होणार मान्सूनला सुरवात?असहिष्णू वातावरणात विनोद फुलू शकत नाही- प्रा मिलिंद जोशीपुण्यात सायबर चोरट्यांकडून ६ कोटी २५ लाखांची फसवणूकब्युटी पार्लरमधील महिलेकडून अंगठी चोरीलाफ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणीमहिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआडसोशल मीडियावर कृषी विभागात नोकरीची जाहिरातवानवडीत अतिक्रमणांवर बुलडोझर; अनधिकृत टपऱ्या हटवल्याट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या तरुणाने सोडला श्वास

काळू धरणवासियांच्या संघर्षाला पाठबळ

आमदार किसन कथोरे यांचा धरण विरोधी संघर्षाला पाठिंबा

marathinews24.com

ठाणे – जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यासह मुंबई व ठाणेसह इतर महानगरांना पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित असलेल्या काळू धरणाचा संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसू लागताच काळू धरण बाधित शेतकरी, तळेगांव यांच्या माध्यमातून मौजे तळेगाव. येथे “शेतकरी मेळावा ” आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी काळू बाधित क्षेत्रातील निवडक गावातील रहिवासी आणि काळू क्षेत्राबाहेरील शेतकरी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थेट न्यायालयातील स्क्रीन समोर उडवली कॉलर – सविस्तर बातमी

सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात सर्वतोपरी काळू धरण परिसरातील सर्वच रहिवाश्यांच्या व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून, संघर्षात साथ देण्याचे व पुढील काळात मार्गदर्शन करण्याचे आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी दिले. बारवी प्रकल्पात झालेले पुनर्वसन हे आज राज्यातील नव्हे तर देशातील आदर्श पुनर्वसन ठरत असल्याचे आग्रही प्रतिपादन आमदार कथोरे यांनी केले. यावेळी ठाणे जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले प्रस्तावित काळू धरणाला विरोध करण्याचा एकमुखी निर्धार हा पुढच्या पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी गरजेचा आहे. तर जनसामान्यांच्या भावना जाणून यापुढील काळातील सर्वच विधायक कार्याला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले, तसेच एकदिलाने आणि विश्वासाने संघर्ष करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले . याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पवार, जेष्ठ नेते सुहास मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदा उघडा, माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत, आदिवासी प्रतिनिधी राजेश शिंगवा, शाई धरण विरोधी संघर्ष समितीचे उमेश वारघडे उपस्थित होते.

समितीचे अध्यक्ष संभाजी फनाडे यांनी,”स्थानिक लोकप्रतिधी यांनी आजच्या घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले .तर ज्येष्ठ शेतकरी नेते हरिभाऊ राऊत संबोधित करताना म्हणाले “धरण हे आमच्या सर्वावर ओढवलेले मरण असून त्या आंदोलनात जर कोणी गैरसमज पसरवीत असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्याची हिंमत आम्हा शेतकरी वर्गात असल्याचे ठाम विश्वास व्यक्त केला.तसेच आम्हा धरणाच्या संभाव्य बाधित क्षेत्रातील रहिवासी किंवा संघर्ष समितीत दुही माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांची गय करणार नसल्याचा इशारा काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे सह-अध्यक्ष पोपटराव देशमुख यांनी दिला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×