साडे सातशे मीटर चा रस्ता करण्याच्या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच पुणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर तीन तासांपासून ठिय्या आंदोलन
Marathinews24.com
पुणे – भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या साडे सातशे मीटरचा रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. तो रस्ता क्रॉंक्रीटीचा करण्यात यावा,या मागणीसाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मागील तीन तासापासून उपोषण करित ठिय्या आंदोलनास बसल्या आहेत.तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यास आले नाही.यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहण्यास मिळत आहे.
शेतकऱ्याकडून घेतली १ लाखाची लाच – सविस्तर बातमी
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे जिल्हय़ातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान हे अंतर जवळपास साडे सातशे मीटरचे अंतर आहे.या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून तो रस्ता करण्यात यावा,यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही.त्यामुळे आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनास जोवर लेखी आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.