Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

सस्पेन्स थ्रीलर ‘हॅलो कदम – त्या रात्री काय घडलं होतं?’ येत्या १९ सप्टेंबरला प्रेक्षकांसमोर

सस्पेन्स थ्रीलर ‘हॅलो कदम – त्या रात्री काय घडलं होतं?’ येत्या १९ सप्टेंबरला प्रेक्षकांसमोर

१९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार

marathinews24.com

पुणे – मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांचा वारसा असला तरी सस्पेन्स थ्रिलर या प्रकारात अजूनही प्रयोग कमी प्रमाणात झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर लेखक-दिग्दर्शक आकाश आशा नितीनचंद्र डावखरे यांनी एक हटके आणि रोमहर्षक कथा प्रेक्षकांसमोर सादर करण्याची तयारी केली आहे. ‘हॅलो कदम – त्या रात्री काय घडलं होतं?’ हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून थरार, रहस्य आणि नाट्य यांचा अनोखा मेळ घालणारा ठरणार आहे.

राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत बालक-पालक मेळाव्यांद्वारे जनजागृती – सविस्तर बातमी 

निर्माते संतोष सायकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चित्रपटात अधीश पायगुडे, श्वेता कामत, सूरज सोमवंशी, प्रांजली कांजरकर , राहुल बोऱ्हाडे , सचिन बांगर, विजय प्रजापती यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाला श्री गुरुनाथ श्री यांचे भावपूर्ण संगीत लाभले असून आकाश संते आणि अर्पित कोमल यांनी आकाश डावखरे यांच्या गीतांना सुरेल स्वर दिले आहेत.

चित्रपटाची कथा एका नायकाभोवती फिरते — एका पोलिस अधिकाऱ्याभोवती. त्याची पत्नी आणि मुलगी यांचे अपहरण झाल्यानंतर तो मानसिक आणि शारीरिक संघर्षाचा सामना करतो. अपहरणकर्ता त्याला काही टास्क देतो, परंतु हे टास्क नेमके कोणते आणि त्यामागे काय रहस्य दडले आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपट अनुभवावा लागणार आहे. याबाबत आकाश डावखरे म्हणाले,

“ही कथा केवळ रहस्य उलगडण्याची नाही, तर एका कुटुंबाच्या संकटात अडकलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या मानसिक संघर्षाचीही आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवणारा हा थरारक प्रवास असेल.विशेषतः चित्रपटाची शेवटची १० मिनिटे प्रेक्षकांना सुन्न करणारी असतील.”

निर्माते संतोष सायकर म्हणाले, “आमचा प्रयत्न नेहमीच वेगळ्या आणि प्रभावी विषयावर चित्रपट निर्माण करण्याचा असतो. ‘हॅलो कदम’ ही कथा पूर्णपणे वेगळ्या शैलीची असून संपूर्ण टीमने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. पुणे आणि शिरूर परिसरात चित्रिकरण झाले असून प्रत्येक दृश्यावर बारकाईने काम केले आहे.” रहस्य, थरार, नाट्य आणि भावनिक संघर्ष यांचा समतोल राखणारा हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे. १९ सप्टेंबरला आपल्या जवळच्या सिनेमागृहात हा थरारक प्रवास अनुभवायला विसरू नका!

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×