Breking News
शिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; १२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागवैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वनभारतीय संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रभावी – डॉ. गो. बं.  देगलूरकर

बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करा

बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करा

बेघर नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण – सहायक आयुक्त विशाल लोंढे

marathinews24.com

पुणे – बेघर नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण असून रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केली. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रमाई आवास घरकुल निर्माण, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत जिल्हास्तरीय समिती, तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती, मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय तसेच अनुदानित वसतिगृह निरीक्षण समिती, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची आढावा बैठकीत ते बोलत होते.

पुणे जिल्हयामध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न – सविस्तर बातमी 

लोंढे म्हणाले, समाज कल्याण विभागाच्यावतीने ९७३ तृतीयपंथीयांना ओळखपत्र, प्रमाणपत्र, ८०५ मतदान कार्ड उपलब्ध करुन देण्यात आले असून याबाबत पुणे जिल्हा देशात क्रमांक एकवर आहे. शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्याबाबत विशेष शिबीर आयोजित करावे. याकरिता सामाजिक संस्थेची मदत घ्यावी.

रमाई आवास घरकुल योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता विशेष मोहीम राबवावी. लाभार्थ्यांचे घरकुलाबाबत एका महिन्यात प्रस्ताव सादर करावे. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक करिता विरंगुळा केंद्राची स्थापना करावी. केंद्राकरिता जागा उपलब्धतेकरिता प्रशासनाने स्थानिक लोकोप्रतिनिधीशी समनव्य साधावा. ज्येष्ठ नागरिकांच्या पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त तक्रारीचे पोलीसाने प्राधान्याने निराकरण करावे. आरोग्य विभागाने त्यांना उपचार वेळेत मिळेल यादृष्टीने कार्यवाही करावी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ९ जुलै २०१८ रोजीच्या धोरणाची अंमलबजावणी करुन ज्येष्ठांना न्याय मिळवून देण्याची कार्यवाही करावी.

शासकीय आणि अनुदानित वसतिगृहामधील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोई-सुविधांबाबत त्यांच्याशी चर्चा करुन अडीअडचणीचे निराकरण करावे. भाड्याच्या जागेवर असलेल्या इमारती शासकीय जागेवर बांधण्याचे नियोजन असून जागांबाबत संबंधित विभागाने पाठपुरावा करावा.

जिल्ह्यातील साखर कारखान्याने संबंधित ग्रामसेवकाशी समन्वय साधून ऊसतोड कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात यावे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. तसेच कामगारांना नियमितपणे अन्नधान्य मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना लोंढे यांनी दिल्या. यावेळी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×