Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

वेतनासंदर्भातील निकाल पथदर्शी ठरेल-पुष्कराज पाठक

वेतनासंदर्भातील निकाल पथदर्शी ठरेल-पुष्कराज पाठक

कला महाविद्यालयातील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्यावतीने गौरव

marathinews24.com

पुणे – माणुसकी हा संस्थेचा पाया आहे. दिवंगत सचिव भालचंद्र पाठक यांनी घालून दिलेल्या आदर्शावर संस्था कार्यरत आहे. संस्थेला यशोशिखरावर नेण्यासाठी सकारात्मक मानसिकता, प्रामाणिक प्रयत्न आणि संयम अपेक्षित असतात, असे प्रतिपादन भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक यांनी केले. कला महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील निकाल पथदर्शी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अस्सल मराठी लोककलांच्या जागरात रंगले ‘द फोक आख्यान’ – सविस्तर बातमी 

राज्यातील अनुदानीत कला महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनासंदर्भात केलेल्या प्रयत्नामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान टळले आहे. या निमित्त राज्यातील कला महाविद्यालयांच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राचार्य संघटनेच्या वतीने सचिव पुष्कराज पाठक यांचा आज (दि. 16) सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन पाठक यांचा सत्कार करण्यात आला. स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अभिनव कला महाविद्यालयाचे (टिळक रोड) प्राचार्य विलास चोरमले, अभिनव कला महाविद्यालयाचे (पाषाण) प्राचार्य डॉ. संजय भारती, माजी प्राचार्य राहुल बळवंत, विभाग प्रमुख राहुल बोरावके, प्रा. जितेंद्र गाडेकर, प्रा. सतिश काळे मंचावर होते.

पुष्कराज पाठक म्हणाले, शैक्षणिक संस्थांना उत्पन्नाचे साधन नसते. संस्थेला शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 90 टक्के अनुदान मिळत असले तरी संस्था 10 टक्के विना अनुदान तत्त्वावर कार्यरत होती. याच नैसर्गिक न्यायतत्त्वावर न्यायालयात दाद मागण्यात आली. संस्थेची ही भूमिका ग्राह्य धरण्यात आली. या निर्णयाचा फायदा केवळ अभिनव कला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर राज्यातील कला महाविद्यालयातील शिक्षक-कर्मचाऱ्यांना झाला आहे.

डॉ. संजय भारती म्हणाले, शिक्षक-कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटावा यासाठी अनेक वर्षे प्रयत्न होत होते परंतु यश येत नव्हते. पुष्कराज पाठक यांनी योग्य पद्धतीने न्यायालयीन लढा दिल्यामुळे प्रश्न सुटला आहे. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने संस्थेने प्राधान्य दिले असल्याचे विलास चोरमले म्हणाले. प्रा. राहुल बळवंत, प्रा. अरविंद कोळप, प्रा. समीर आगळे, प्रा. प्रज्ञा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचानल अनंत डेरे यांनी केले तर आभार आत्माराम पुंड यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×