Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

बीड जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटील पदे भरण्यासाठी मुहूर्त ठरला

१९ जानेवारीपासून प्रत्यक्ष भरती अर्ज प्रक्रिया सुरु

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील पोलीस पाटील पदांच्या रिक्त असलेल्या जागेसाठी मुहूर्त ठरला आहे. पोलीस पाटील पदाच्या विविध गावांमध्ये रिक्त जागा असल्याने भरतीचे नुकतेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, १९ जानेवारीपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. भरती प्रक्रियेचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत वेदांतने पटकावला तिसरा क्रमांक – सविस्तर बातमी

जिल्ह्यातील विविध गावांमधील आरक्षण प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर आता रिक्त पदासाठी जागा भरण्याच्या हालचालींना वेग आला असून, येणाऱ्या २ मार्च २०२६ रोजी या भरतीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेच्या नियोजित वेळापत्रकानुसार, १९ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.आणि त्याच दिवसापासून ३० जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज सादर करता येतील. अर्जाची छाननी करणे आणि पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र वाटपाचे काम २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान पूर्ण केले जाणार आहे. पोलीस पाटील पदासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली लेखी परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच २४ फेब्रुवारीला या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.

लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. संपूर्ण प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून २ मार्च २०२६ रोजी भरतीचा अंतिम निकाल घोषित केला जाणार आहे. ही भरती प्रक्रिया राबवताना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ आणि संबंधित शासन निर्णयांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश बीड, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई आणि परळी या उपविभागांतील सर्व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे की, भरती प्रक्रिया राबविताना न्यायालयीन आदेश, शासन सूचना आणि वेळोवेळी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही याची विशेष दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे. या पदभरतीमुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेच्या कामात मोठी मदत होणार असून रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×