बाणेर पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – फ्लॅटच्या उघड्या दरवाजाची संधी साधून घरातील ५ मोबाइल, लॅपटॉप, एटीएम कार्ड, तीन हजारांची रोकड चोरी करणार्याला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुवाहाटी (आसाम) येथुन केली अटक करीत लॅपटॉप, मोबाइल असा ३५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. मोहम्मद इमरान इरफान शेख (वय २४ रा. कोलकत्ता) आणि शेख अफताब अली, शेख हसनअली (वय ३० रा. कॉलीन स्टेट कलकत्ता) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पुण्यातील आमदार बापूसाहेब पठारेंना धक्काबुक्की, २० जणांविरूद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
अज्ञात चोरट्याने घरात शिरून मोबाइलसह लॅपटॉप रोकडची मिळून ७३ हजारांची चोरी केली होती. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपी हा कलकत्ता याठिकाणी असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांचे पथक त्याठिकाणी पोहचेपर्यंत आरोपी शेख हसनअली गुवाहाटी आसाम राज्यात गेला. त्याठिकाणी मोहम्मद इमरान इरफान शेख (वय २४ रा. मलीकापुर गल्लीपुरा प्यादया पाडा, कोलकत्ता पश्चिम बंगाल) याला पथकाने ताब्यात घेतले.
आरोपीने चोरी केलेले लॅपटॉप कलकत्तामधील चांदणी मार्वेâटमध्ये विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार तपास पथक आरोपीसह पुन्हा कलकत्ता याठिकाणी दाखल झाले. लॅपटॉप विकत घेणारा शेख अफताब अली, शेख हसनअली याचा शोध घेउन त्याला अटक केली. तपासादरम्यान गुन्हयातील मुख्य आरोपीकडुन लॅपटॉप, मोबाईल, ५ एटीएम कार्ड असा ३५ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग, एपीआय के.बी डाबेराव, बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत रोहीत पाथरुट यांनी केली.





















