Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात चोरट्यांचा उच्छाद

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

marathinews24.com

पुणे – दिवाळीनंतर शहरात घरफोड्यांचे सत्र कायम आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याच्या घटना घडल्या.

ज्येष्ठ महिलेची एक कोटी १९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

लोहगाव भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, साेन्याचे दागिने असा एक लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोहगावमधील दादाची वस्ती भागात सदगुरु सोसायटीत राहायला आहेत. दिवाळीनिमित्त तक्रारदार आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. २६ ऑक्टोबर रोजी ते परतले. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले. पोलीस कर्मचारी एस. एल. जामदार तपास करत आहेत.

लोहगावमधील वडगाव शिंदे परिसरात असलेल्या एका घरातील कपाटातून ९५ हजारांची सोन्याची माळ चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरूरे तपास करत आहेत.

नांदेड सिटीत बांधकाम साहित्य चोरी

नांदेड सिटीच्या आवारात ठेवलेले तीन लाख १५ हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार नांदेड सिटी डेव्हपलमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनीत कर्मचारी आहेत. नांदेड सिटीच्या आवारातील बहार इमारतीच्या परिसरात ठेवलेले बांधकाम साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.

धायरीतील घरातून दागिने चोरी

सिंहगड रस्त्यावरील धायरी भागातील एका घरातून ५० हजारांचे साेन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला धायरीतील वारांगणी मळा परिसरात राहायला आहेत. त्यांचे बैठे घर आहे. महिलेने डब्यात सोन्याचे दागिने ठेवले होते. चोरट्यांनी देवघरातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक खरमाटे तपास करत आहेत.

कामगाराकडून एक लाखांचे वेलदोडे चोरी

मार्केट यार्ड भागताील भुसार बाजारातील एका दुकानात कामगाराने एक लाख रुपयांचे वेलदोडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत भुसार बाजारातील एका व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यापाऱ्याचे मार्केट यार्डातील भुसार बाजारात दुकान आहे. त्यांच्या दुकानात कामाला असलेल्या कामगाराने एक लाख रुपयांचे वेलदोडे चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक गडगडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×