Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात महिलांसह तिघांचा मृत्यू

Dive Ghat ST Bus Accident

उत्तमनगर, ओैंध, नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना

marathinews24.com

पुणे – शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उत्तमनगर, ओैंध, नगर रस्ता भागात अपघाताच्या घटना घडल्या. एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात दुचाकी घसरुन सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शर्ली एन. ॲंथोनी (वय ३७, रा. वांजळे बिल्डींग, कोंढवा गेट, उत्तमनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोरमध्ये पादचारी तरुणाला धमकावून लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात २ जानेवारी शर्ली आणि त्यांचे पती दुपारी पावणेतीनच्या सुमारास उत्तमनगर येथील भाजी मंडई परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील सहप्रवासी शर्ली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भरधाव दुचाकी चालवून पत्नीच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे तपास करत आहेत.

पीएमपी बसच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ओैंध रस्त्यावर घडली. चंद्रकला ज्ञानोबा वाव्हाळ (वय ७५ रा. इंदिरा गांधी वसाहत, ओैंध, गणेशखिंड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पीेएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभावती भोसले (वय ७४, रा. ओैंध) यांनी याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंद्रकला वाव्हळ या ३० जानेवारी रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास गणेशखिंड रस्त्याने निघाल्या होत्या. ओैंध परिसरात केंद्रीय विद्यालयासमोरुन त्यान रस्ता ओलांडत होत्या. त्या वेळी भरधाव पीएमपी बसने त्यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव तपास करत आहेत.

पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना पाठीमागून आलेल्या ट्रकच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्ता भागात घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. रणजीत प्रकाश भोसले (वय ५१, रा. वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत प्रवेश यादव (वय ३२, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव यांचे मित्र रणजीत हे शनिवारी मध्यरात्री नगर रस्त्यावरील पीएमपी थांब्यावर थांबले होते. पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकच्या धडकेत भोसले यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीश्रक नवनाथ क्षीरसागर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×