Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पत्रकार संघाच्यावतीने श्रद्धांजली

ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पत्रकार संघाच्यावतीने श्रद्धांजली

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने अर्पण केली श्रद्धांजली 

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पत्रकार संघाच्यावतीने श्रद्धांजली – दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार संघातील आजी माजी सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शहरातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली अर्पण सभा मंगळवारी आयोजित केली होती. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, दिवंगत पत्रकार अमित गोळवलकर यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.

बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करा -सहायक आयुक्त विशाल लोंढे – सविस्तर बातमी 

पत्रकार शैलेश काळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे, राजेंद्र जोशी, ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे, अभय कुलकर्णी,स्वप्नील पोरे, कल्पना खरे यांच्यासह नम्रता वागळे,अंजली खमीतकर, सुनीत भावे, स्वप्नील बापट, मिलींद वाडेकर, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. गोळवलकर यांचा मुलगा अ‍ॅड.अथर्व गोळवलकर यानेही आपल्या पित्याबद्दल आठवणी शेवटी सांगितल्या. त्यानंतर सर्वांनी एक मिनीट स्तब्ध उभे राहून दिवंगत अमित गोळवलकर यांच्या स्मृतींना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण केली.

सडेतोड बोलणार हसमुख पत्रकार गेला-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

सर्वांनीच त्यांच्या बद्दलच्या आठवणी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितल्या. गोळवलकर हे क्राईम आणि क्रीडा रिपोर्टर होते मात्र ,बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांचे होते. प्रिंटसह चॅनल क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला. त्यांनी जलतरण क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. टिळक जलतरण तलावाचे सचिव म्हणून त्यांनी भरीव काम केले अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठविलेल्या शोक संदेशही वाचून दाखविण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×