Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोघांची १३ लाखांची फसवणूक

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोघांची १३ लाखांची फसवणूक

चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखून फसवणूक

marathinews24.com

पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची १३ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी आंबेगाव आणि येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कात्रजमधील आंबेगाव परिसरात राहणाऱ्या एकाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले.

आधी मोबाइल हिसकावला, मग बँकखाते केले रिकामे – सविस्तर बातमी 

तक्रारदाराला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात तक्रारदाराने चार लाख ८२ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर तक्रारदाराला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातील एका महिलेची अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी आठ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद कारंडे तपास करत आहेत.

बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी

बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एकाची पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. बँकेकडून ग्राहकांची माहिती घेण्यात येत असून, बँक खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. चोरट्यांनी तक्रादाराच्या मोबाइल क्रमांक हॅक केला. मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा घेतल्यानंतर चोरट्यांनी खात्यातून पावणेतीन लाख रुपयांची रक्कम काढून घेतली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×