Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

दोन बहिणींना बेदम मारहाण, टोळक्याला अटक

कदमवाक वस्तीवरील घटना

marathinews24.com

पुणे – घरामध्ये शिरून टोळक्याने दोन्ही बहिणींना बेदम मारहाण केल्याची घटना १५ नोव्हेंबरला रात्री दोनच्या सुमारास लोणी काळभोरमधील कदमवाक वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी चौघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरूद्ध आर्मअ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारुप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास मुदतवाढ – सविस्तर बातमी

तुषार रामलिंग घोडे (वय २५ रा. रामटेकडी, हडपसर) सर्फराज समीर शेख (वय २०, रा. गंगानगर, हडपसर ) करण कन्हैया गुजराती (वय २०) आणि अरण जावेद शेख (वय २२ रा. वैदवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.मोनिका दोडके (रा. येरवडा) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोनिका आणि त्यांची बहीण कदमवाक वस्तीवर राहायला आहेत. १५ नोव्हेंबरला रात्री दोनच्या सुमारास टोळक्याने त्यांच्या घरात शिरून दोघीनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर हातातील लोखंडी हत्यार तक्रारदार तरूणीला मारण्यासाठी अंगावर उगारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×