बिनविरोध निवड झाल्यामुळे तरुणाईमध्ये आनंदोत्सव
marathinews24.com
पुणे – महानगरपालिका जवळच्या सर्वात मोठी असलेल्या केसनंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विशाल विशाल बाजीराव हरगुडे पाटील याची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर ढोल-ताशाच्या गजरात गुलालाची उधळण आणि फटाके फोडून मिरवणूक काढण्यात आली.
श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240 व्या आराधना महोत्सवाला सुरुवात – सविस्तर बातमी
पुणे कृषी उत्पन्न समिती चे माजी सभापती प्रकाश जगताप, संचालक शशिकांत गायकवाड, माजी उपसभापती सारिका हरगुडे, मिनाकाकी सातव, केसनंद गावचे नेतृत्व मिलिंद नाना हरगुडे यांच्या नेतृत्वाखालील निवडून आल्याचे नवनिर्वाचित सरपंच विशाल हरगुडे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, केसनंद ग्रामपंचायत कार्यकारिणीला नवनियुक्त सरपंच विशाल हरगुडे पाटील यांच्यामुळे विकासाला निश्चित गतिमानता येईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
केसनंद गावच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्राधान्य दिले जाणार असून, गावचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेतले जाणार आहे. शालेय, महाविद्यालय विद्यार्थी- विद्यार्थिनी महिलांच्या सुरक्षेसह विकासासाठी कटिबद्ध असल्याचे विशाल हरगुडे पाटील यांनी सांगितले आहे.