फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – सायबर चोरट्यांनी महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून तिची २ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रविवार पेठेत राहायला आहे.
शेअरमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने गंडा – सविस्तर बातमी
सायबर चोरट्यांनी महिलेच्या समाज माध्यमातील खात्यावर मैत्रीची विनंती पाठविली होती. महिलेने मैत्रीची विनंती स्विकारल्यानंतर चोरट्यांनी परदेशात वास्तव्यास असल्याची बतावणी केली. परदेशातून भेटवस्तू पाठविण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी तिला दाखविले होते. त्यानंतर विमानतळावर सीमाशु्ल्क विभागाने (कस्टम) भेटवस्तू जप्त केल्या आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी महिलाल वस्तू परत मिळवण्यासाठी तातडीने बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील, असे सांगितले होते.
महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक नामवडे तपास करत आहेत.



















