Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

पुण्यात खरेदीसाठी गेलेल्या महिलांकडील ऐवज चोरीला

भरदिवसा सराफाची दागिन्याची बॅग पळवली

विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पिशवीतून २ लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फुरसुंगीत वीजेच्या धक्क्याने तरुण प्लंबर ठार, दोघांविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

तक्रारदार महिला पिंपरी-चिंचवड परिसरात राहायला आहेत. त्या गुरुवारी (२१ ऑगस्ट) लक्ष्मी रस्त्यावरील एका वस्त्रदालनात खरेदीसाठी गेल्या होत्या. बेलबाग चौकात गर्दी होती. महिलेने तिचे मंगळसूत्र पिशवीत ठेवले होते. चोरट्यांनी गर्दीत पिशवीची चेन उघडून दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र लांबविले. खरेदी केल्यानंतर महिलेने पिशवीची पाहणी केली. तेव्हा पिशवीतून मंगळसूत्र चोरीला गेल्याचे उघडकीस आले. पोलीस कर्मचारी पडघमकर तपास करत आहेत. तुळशीबाग, रविवार पेठेतील कापडगंज परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने आणि रोकड लांबविण्यात आल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून दागिने चोरीला जाण्याची ही चौथी घटना आहे.

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पादचारी महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना वाघाोेलीतील केसनंद रस्ता परिसरात घडली. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वाघोली परिसरात राहायला आहेत. त्या गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास केसनंद रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री थोरात तपास करत आहेत.

साधू वासवानी चौकात मोबाइल हिसकावला

पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवानी चौकात पादचाऱ्याचा मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना बुधवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी घडली. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे साधू वासवानी चौकातून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील ५० हजार रुपयांचा मेाबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×