Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

फुरसुंगीत वीजेच्या धक्क्याने तरुण प्लंबर ठार

वीजेच्या धक्क्याने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू

ठेकेदारासह दोघांविरूद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्लंबिंगचे काम करताना वीजेचा धक्का बसून तरूण कामगाराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कामगारांच्या सुरक्षिततेदृष्टीने साधन सामु्रगी न पुरविल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदारासह दोघांविरूद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० जुलैला हांडेवाडीतील अर्णव डीओपी सर्व्हे १३, औताडे हांडेवाडीत घडली आहे.

पुण्यात गांजा विक्रीत पोलीस कर्मचारी सामील; कर्मचारी निलंबित – सविस्तर बातमी 

अजय नंदलाल मौर्या (वय ३०, रा. कुंजीरवाडी, हवेली) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आशिष अरूण मेथर (रा. वडगाव बुद्रूक) आणि आशिष मौर्या (रा. कुंजीरवाडी, मांजरी बुद्रूक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडेवाडीतील अर्णव डीओपी सर्व्हे १३ याठिकाणी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराकडून बिगारी अजय मोर्या याच्याकडून काम करवून घेतले जात होते. प्लंबिंगचे काम करीत असताना आरोपींनी मोर्याला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून साहित्य पुरवले नाही. त्यामुळे वीजेचा धक्का बसून अजय मोर्याचा मृत्यू झाल्याची घटना ३० जुलैला घडली होती. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. तपासाअंती दोघेजण बिगारीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×