८ लाख ५८ हजारांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – टास्कचे आमिष दाखवून जास्तीचा परतावा देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ८ लाख ५८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना २८ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर कालावधीत सदाशिव पेठेतील नागनाथ पाराजवळ घडली आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय तरूणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीस्वार मुलीला अडवून केला वार, आरोपीला अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण सदाशिव पेठेत राहायला असून, २८ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्याला व्हॉटसअॅपद्वारे लिंक पाठविली. टास्क पुर्ण करण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराचा विश्वास संपादित केला. त्यानंतर जास्तीचा परतावा देण्याचे सांगून सायबर चोरट्यांनी तरूणाला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तब्बल ८ लाख ५८ हजार रूपये वर्ग करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरूण घोडके तपास करीत आहेत.




















