Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

सायबर चोरट्यांकडून तरुणीची ७ लाखांची फसवणूक

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची सात लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बँकेतून बोलत असल्याची बतावणी; ज्येष्ठ महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही महर्षीनगर परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी १५ जून रोजी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष चोरट्यांनी तरुणीला दाखविले. तरुणीला जाळ्यात ओढून चोरट्यांनी तिला ऑनलाइन पद्धतीने काम करण्यास सांगितले. या कामाचे तिला पैसे दिल्याचे भासवले. प्रत्यक्षात तरुणीच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे परतात. या कामात पैसे गुंतविल्यास फायदा होईल, असे सांगून चोरट्यांनी तरुणीला पैसे गुंतविण्यास भाग पाडले. तरणीने चोरट्यांच्या खात्यात सात लाख दहा हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी तरुणीला पैसे दिले नाहीत. तरुणीने तीन दिवसात चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ७ लाख १० हजार रुपये जमा केले. सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×