Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

लोणी काळभोरमध्ये वादातून तरुणाला मारहाण

रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरीला

टोळक्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शंतनू धुमाळ, तेजस काळभोर, शुभम वीरकर, साहिल कोल्हे यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांजा विक्री प्रकरणात उत्तर प्रदेशातील तस्करांना अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपींनी जुन्या वादातून तरुणाला लोणी काळभोर परिसरात तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.

मोबाइल विक्री दुकानात चोरी

पुणे-मोबाइल विक्री दुकानाचा दरवाजा उतकटून चोरट्यांनी मोबाइल, तसेच अन्य साहित्य असा एक लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना लोणीकंद भागात घडली.

व्यावसायिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई रस्त्यावर मोबाइल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून जुने आणि नवीन मोबाइल, अन्य साहित्य असा मुद्देमाल लांबविला. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन थेरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×