Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या पतीला अटक

पुण्यातील पर्वती दर्शन परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर २२ वर्षीय मुलाने शनिवारी (दि.२७) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना पर्वती दर्शन परिसरात घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पर्वती दर्शन परिसरात शोककळा पसरली. मंदा गणेश दोडके (वय २५), साहिल गणेश दोडके (वय २५, दोघे रा. पर्वती दर्शन) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

आमदार नमिता मुंदडा यांनी केले घुले कुटुंबीयांचे सांत्वन – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडके कुटुंबीय दांडेकर पूल येथे राहायला होते. तिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. नवीन इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर दोडके कुटुंबीयांनी पर्वती दर्शन परिसरात भाडेतत्त्वावर खोली घेतली. मंदा दोडके या ज्येष्ठ नागरिकांच्या शुश्रुषेचे काम करायच्या. दाेडके यांना चार मुली आहेत. साहिल हा एकुलता एक होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाटी तो सकाळी दूध पिशवी वितरणाचे काम करायचा, तसेच लिफ्ट दुरस्ती, देखभाल करणाऱ्या व्यावसायिकाकडे तो काम करत होता.

गुरुवारी (२५ जून) पहाटे मंदा यांना अर्धांगवायूचा झटका आला. साहिलने त्यांना ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांची प्रकृती खालवल्याने मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्यानंतर साहिल खचला. त्यानंतर तो घरी गेला. शनिवारी (२७ जून) साहिलने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी नातेवाईकांनी दरवाजा वाजविला. तेव्हा त्याने प्रतिसाद दिला नाही. साहिलच्या भाच्याने दरवाज्याच्या फटीतून पाहिले. तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. साहिल एकुलता एक होता. चार मुलीनंतर साहिलचा जन्म झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तो काम करुन मदत करत होता. साहिलचे आईवर खूप प्रेम होते. आईच्या मृत्यूची माहिती मिळताच तो खचला. तो ससून रुग्णालयातून तो घरी गेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. शोकाकुल वातारवणात शनिवारी सायंकाळी वैकुंठ स्मशानभुमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×