Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

घरफोड्या करणाऱ्या दोघांना बेड्या

घरफोड्या करणाऱ्या दोघांना बेड्या

दागिने व चांदी जप्त

marathinews24.com

पुणे – घरफोड्या करणाऱ्या दोन चोरट्यांनी काळेपडळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सोन्या-चांदिचे दागिने व मोबाईल असा पावणे तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. कोंढवा भागातून त्यांना पकडण्यात आले. वैभव उर्फ बाब्या संजय गायकवाड तसेच प्रशांत उर्फ चिक्या भारत कसबे (रा. साठेनगर, तरवडे वस्ती) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा
पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

पैशासाठी पोलीस असल्याचा बनाव करून अपहरण – सविस्तर बातमी 

शहरातील वाढत्या गुन्ह्यांना तसेच विशेषत: घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके हद्दीत गस्त घालत आहेत. मंहमदवाडी परिसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी ४ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. यामध्ये सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना काळेपडळ ठाण्यातील अंमलदार अतुल पंधरकर व गिरीराज जगदाळे यांना बातमीदारामार्फत आरोपी वैभव व प्रशांत यांच्याबाबत माहिती मिळाली. माहितीनुसार पथकाने दोघांना कोंढवा भागातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पोलिसांनी २ लाख ८३ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे यांच्यासह पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×