Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात सायबर घोटाळ्याच्या नावाखाली १ कोटी ६२ लाखाचा गंडा

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

जेष्ठ महिलेची २० दिवसांत फसवणूक

marathinews24.com

पुणे – बँक खात्यात तब्बल २०० कोटी रूपयांचा व्यवहार झाल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ महिलेला जाळ्यात पकडले. त्यानंतर संबंधित बँकखाते तपासणीसाठी करावयाचे सांगून त्यांना तब्बल १ कोटी ६२ लाख रूपये विविध बँकखात्यात वर्ग करण्यास भाग पाडले आहे. ही घटना १० ते ३० मार्च २०२६ कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ७७ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाइल धारकारसह बँक खातेदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात रविवार पेठेत महिलेच्या पिशवीतून रोकड चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला कोथरूडमध्ये राहायला असून, १० मार्चला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून संपर्क साधला. महिलेचे नाव आणि आधारकार्ड वापरून कॅनेरा बँकेत अकाउंट काढण्यात आले असल्याची बतावणी केली. त्या बँक खात्यातून तब्बल २०० कोटी रूपयांचा व्यवहार झाल्याचे महिलेला सांगण्यात आले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदार जेष्ठ महिलेचा विश्वास संपादित केला. त्यांना बँकखाते व्हेरीफाय करावयाचे असल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला विविध बँकखात्यात रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. अवघ्या २० दिवसांत महिलेने साबयर चोरट्यांनी दिलेल्या बँकखात्यात तब्बल १ कोटी ६२ लाख रूपये वर्ग केले. मात्र, त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी विचारणा केली असता, सायबर चोरट्यांनी महिलेसोबत संपर्क बंद केला.

सायबर चोरट्यांनी तब्बल १ कोटी ६२ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार घेउन महिला पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून, पेमेंट गेटवे तसेच इतर तांत्रिक बाबी तपासून आरोपींची बँकखाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अशाच प्रकारे आता सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकांना टारगेट करीत ऑनलाईनरित्या लुट सुरू केली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणातील आरोपींचा माग काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×