Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

सिया, चेतनच्या पोलीस कोठडीत ५ दिवसांची वाढ

सिया, चेतनच्या पोलीस कोठडीत ५ दिवसांची वाढ

केतन अग्रवाल खून प्रकरण

marathinews24.com

पुणे – व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या खून प्रकरणी अटक केलेली त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ५ दिवसांची वाढ केली आहे. सोमवारी दि.२९ कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपींना पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले होते. तपासातील काही शिल्लक बाबींच्या चौकशीसाठी पोलिस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. त्यामुळे दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार, दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

जबरी चोरी करणार्‍या सराईताला बेड्या, ४ मोबाइल जप्त – सविस्तर बातमी 

तपासातील काही शिल्लक बाबींच्या चौकशीसाठी कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. आरोपींनी कट रचला असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, गुन्हा कसा केला याचा तपास करायचा आहे. कट कुठे बसून केला हे तपासायचे आहे. सियाप्रमाणे चेतनला घेऊन रिक्रियेशन करायचे आहे. लोहगडावर अनेकांशी संवाद साधला आहे. बालीला प्री-वेडिंग शूटला जायचे नव्हते म्हणून, पासपोर्ट फाडले. तो केतनचा पासपोर्ट शोधायचा आहे. लोहगडावर जाऊन रेकी केली का ? हे तपासायचे आहे ? या कटात कोणी सहभागी आहे का ? केतनचा मोबाईल काही वेळाने देण्यात आला, त्यातील माहिती रिकव्हर करायची आहे. त्यांनी माहिती लपवली आहे, ती मिळवायची आहे. त्यामुळे आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

आरोपींना केलेली अटक कायद्याला धरुन आहे का ? आमचा अर्ज दाखल करून घ्या, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केली. याप्रकरणी तांत्रिक तपास, चौकशी, नाट्य रूपांतर झाले. आता पुढचा तपास तांत्रिक आहे. मग पोलिस कोठडीची गरज वाटत नाही, असा युक्तिवाद सियाच्या वकिलांनी केला होता. तर नाट्य रूपांतर करायची मागणी केली जात आहे. हे आपल्या देशात झालेले नाही. दरीत पडून मृत्यू झाला आहे. पण इथे हत्या झाली म्हटले जात आहे. आई-वडील म्हणतायेत म्हणून याला हत्या म्हणता येणार नाही. हा गुन्हा जामीनपात्र आहे. त्यामुळे पोलिस कोठडी देऊ नये, असा युक्तीवाद सियाचा वकिल विपुल दुष्यम यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी या आरोपींना ५ दिवसांची (दि. ३ जुलै) कोठडी सुनावली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×