Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

जबरी चोरी करणार्‍या सराईताला बेड्या, ४ मोबाइल जप्त

जबरी चोरी करणार्‍या सराईताला बेड्या, ४ मोबाइल जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – तरूणाला बेदम मारहाण करून जबरी चोरी करणार्‍या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ३० हजारांचे चार मोबाइल जप्त केले आहेत. राहूल सिताराम निकम (वय २८, रा. महमंदवाडी, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

मुलगी आमचीच असल्याचे मानून तपास – पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल – सविस्तर बातमी 

दूध आणण्यासाठी चाललेल्या तरूणाला अडवून टोळक्याने लुटमार केल्याची घटना २४ मे रोजी कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात घडली होती. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिले होते. त्यानुसार उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर हे प्रकरणाचा तपास करीत होते. त्यावेळी आरोपी राहूल निकमला वंडरसिटी परिसरातून ताब्यात घेतले. ही कामगिरी उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी राहूल आवारे, वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×