Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात ३ तरूण ठार

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एनआयबीएम रस्ता, पुणे-सातारा रस्ता, फुरसुंगीत घडले अपघात

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात घडलेल्या अपघातात ३ तरूण जागीच ठार झाले आहेत. अपघाताच्या घटना एनआयबीएम रस्ता, पुणे-सातारा रस्ता, फुरसुंगीत घडल्या आहेत. रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेत तरूण मोटार चालक ठार झाला. तर पीएमपीएल बसचालकाने दिलेल्या धडके पादचारी तरूण ठार झाला. तर तिसर्‍या अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा जीव गेला आहे. याप्रकरणी कोंढवा, पर्वती आणि हडपसर पोलीस ठाण्यात संबंधित बेशिस्त चालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्का लागल्यावरून तरूणाला बेदम मारहाण, तिघे अटकेत – सविस्तर बातमी 

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करीत अचानकपणे उजवीकडे वळण घेउन रिक्षा चालकाने मोटार चालकाला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात मोटार चालक तरूण ठार झाला आहे. हा अपघात ११ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास एनआयबीएम रस्त्यावर घडला आहे. प्रसाद प्रल्हाद कुलकर्णी (वय ३६ रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) याप्रकरणी सम्मेद सुधाकर पाटील वय २४ रा. बिबवेवाडी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करीत आहेत.

भरधाव पीएमपीएम बस चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी तरूण ठार झाला आहे. हा अपघात ११ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील तावरे कॉलनी कमानीसमोर घडला आहे. विकी बसवराज कोतले (वय ३० रा. डॉ. आंबेडकरनगर मार्वेâटयार्ड) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार ज्ञानेश्वर शिंदे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पीएमपीएल बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नामदे तपास करीत आहेत.

अज्ञात वाहन चालकाने दिलेल्या धडकेत तरूण ठार झाला आहे. हा अपघात ११ ऑक्टोबरला पहाटे सव्वा चारच्या सुमारास हडपसर परिसरातील मंतरवाडीत घडला आहे. गणेश रमेश बोराळे वय २५ रा. भेकराईनगर असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार निखील पवार यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोटार वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×