गर्दीचा फायदा घेउन दागिने चोरले
marathinews24.com
पुणे – गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. या घटना विश्रामबाग परिसरात घडल्या असून, संबंधित महिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई – सविस्तर बातमी
पहिल्या घटनेत तक्रारदार महिला ६ सप्टेंबरला दुपारी पावणेचारच्या सुमारास मध्यवर्ती शिवाजी रोडवर गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन्याची चैन चोरून नेली. काही वेळानंतर महिलेला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस अमलदार पडघमकर तपास करीत आहेत.
गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या कोथरूडमधील महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना ६ सप्टेंबरला रात्री नउच्या सुमारास विश्रामबाग परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरूणासोबत भांडणाचा बनाव करीत लुटले
तरूणासोबत भांडणाचा बनाव करीत लुटले चोरट्याने त्याच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. ही घटना ६ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास येरवड्यातील बंजारा चौकात घडली आहे. त्यानुसार मांजरी ब्रुद्रूकमध्ये राहणार्या १९ वर्षीय तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























