Breking News
पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापरड्रग मुक्त पुणे जनजागृती अभियानाचा शुभारंभजिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी 

कृत्रिम वाळू निर्मितीसाठी व्यवसायिकांनी नोंदणी करावी– जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

रिंगरोड, पुरंदर विमानतळासह विकास कामांना होणार मदत

marathinews24.com

पुणे – नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू निर्मितीचे शासनाचे धोरण लागू करण्यात आले असून, जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या मागणी-पुरवठा तुटवड्याचा विचार करता कृत्रिम वाळू निर्मितीकरिता अधिकाधिक व्यवसायिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

हलाल लाइफस्टाइल टाउनशिप”  सारख्या प्रकल्पावर कठोर कारवाई करावी – सविस्तर बातमी

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात कृत्रिम वाळू धोरण व अमलबजावणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, शार्या इन्फोटेकचे पदाधिकारी, पर्यावरण सल्लागार, प्रायव्हेट टेकचे प्रतिनिधी, खाणपट्टाधारक, क्रशरधारक उपस्थित होते.

डुडी म्हणाले, महसूल व वन विभाग यांच्या २३ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात विविध बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये प्रथम पुढाकार घेणाऱ्या राज्यातील अधिवास असलेल्या आणि नोंदणी केलेल्या ५० संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्याकरिता उद्योग व महसूल विभागाच्या विविध सवलती मिळणार आहेत. महसूल व वन विभागाच्या १७ जुलै २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.

नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू निर्मितीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील रिंगरोड, पुरंदर विमानतळासह विकासाची विविध कामे वेगाने पूर्ण होऊ शकतील. मागणी व पुरवठा यामध्ये ताळमेळ बसविण्याकरिता प्रयत्न करता येतील. एम-सँड प्रकल्पाकरिता स्वामित्वधनामध्ये ४०० रुपये प्रति ब्रास इतकी सवलत शासनाने दिली असल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत सर्व संबंधित विभागांच्यावतीने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली. खाणपट्टाधारक व क्रशरधारक यांच्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यशाळेत साधारणतः २०० इच्छुक व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार हे दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×