Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पुण्यात

छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पुण्यात

१७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन ५ ऑक्टोबरला महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे पार पडणार 

marathinews24.com

पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने १७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक ५ ऑक्टोबरला महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष विक्रम मालन, आप्पासो शिंदे उपस्थित होते.

कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच – सविस्तर बातमी 

ग्रंथपूजनाने संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे. १६ भाषांमध्ये पारंगत असलेले बुधभूषण, नायिकाभेद, सातशतक, नखशिख, ग्रंथाचे लेखन करून मानवी मूल्यांपासून राजनीती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नैतिकशास्त्र, धर्मशास्त्र, विधीशास्त्र, न्यायशास्त्र, वनस्पतीशास्त्र, यासह अनेक विषयांत निष्णात असलेले जागतिक कीर्तीचे विचारवंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलूंचा व त्यांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी राज्यभरात विविध ठिकाणी केले जाते. आतापर्यंत राज्यात छ. संभाजी महाराज यांच्या नावाने १६ साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पडली आहेत. पुण्यात होणाऱ्या या साहित्य संमेलनात रसिक साहित्यिकांनी सहभागी व्हावे यासाठीही आवाहन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×