Breking News
मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरलाजनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

हाफकीन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

हाफकीन संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार - मंत्री नरहरी झिरवाळ

पिंपरी-चिंचवड येथे हाफकीन संस्थेच्या कामकाजाचा घेतला आढवा

marathinews24.com

पुणे – (जिमाका वृत्तसेवा) : हाफकीन संस्था ही जागतिक पातळीवर नावाजलेली राज्य शासनांतर्गत कार्यरत संस्था असून येथे विविध लसींचे दर्जेदार उत्पादन करण्यात येते. या लसींना जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे संस्थेच्या बळकटीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. संस्थेच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

पायलट होण्याची सुवर्णसंधी; पुण्यात “कमर्शियल पायलट लायसन्स” सेमिनार येत्या 21 सप्टेंबर रोजी – सविस्तर बातमी 

पिंपरी-चिंचवड येथील हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ प्रकल्पास भेट देऊन तेथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री.झिरवाळ बोलत होते. या वेळी हाफकीनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, महाव्यवस्थापक डॉ. प्रदीप धिवर, व्यवस्थापक नवनाथ गर्जे, पिंपरी-चिंचवड संस्थेचे व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुहे, अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त गिरीश हुकरे, सहायक आयुक्त कोंडीबा गाडेवार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर योगेश बहल आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री झिरवाळ यांनी प्रतिविष उत्पादन, गुणवत्ता आश्वासन, उत्पादन, पशुवैद्यकीय विभाग, कर्मचारी निवासस्थान, तबेला, सर्पालय यांना भेट देत संशोधन, औषध उत्पादन क्षमता, औषधांची मागणी, पुरवठा, गुणवत्ता, साठवणूक आणि चाचणी प्रक्रियेची माहिती घेतली.

या प्रसंगी श्री. महिंद्रकर यांनी मुंबई केंद्राविषयी तर डॉ. कुहे यांनी पिंपरी-चिंचवड संस्थेच्या जागा, मनुष्यबळ, कर्मचारी निवासस्थान, उपलब्ध साधनसामुग्री आणि आर्थिक स्थितीची माहिती दिली. तसेच संस्थेच्यावतीने उत्पादित सर्पदंश, विंचूदंश, घटसर्प, श्वानदंश, गॅस गँगरीन प्रतिविष, प्रतिधनुर्वात, पोलिओ लस उत्पादन, साठवणूक क्षमता आणि त्यातून जमा होणाऱ्या महसुलीबाबत पीपीटीद्वारे सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×