राजकारण करणाऱ्या पुढार्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी
बीड : अनंत जाधव – राज्यासह बीड जिल्ह्यात मुसळधार गेली दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवल आहे .तरी काही ठिकाणी ढगफुटी दृश्य पाऊस झाला तर काही गावांमध्ये पाणी साचून घरात पाणी शिरले आणि गावातील अनेकांच्या कुटुंब रस्त्यावर आले आहे. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे बीड जिल्हासह केज तालुक्यातील बळीराजाच्या हातातोंडाशी आलेल्या घास सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हिरावून नेल्यामुळे बळीराजाच्या डोक्यावर संकटाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे शेतकऱ्याने जगावं की मराव असा सवाल तालुक्यातील बळीराजा मध्ये उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत बालक-पालक मेळाव्यांद्वारे जनजागृती – सविस्तर बातमी
तालुक्यातील मस्साजोग, आरंणगाव, काळेगाव, बेलगाव, केळगाव, शिंदी, विडा, कोरडेवाडी, पिंपळगाव, सावंतवाडी, सारणी, सांगवी, आनंदगावसारणी, ढाकेफळ, कुभेफळ, होळ सह तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केज तालुक्यातील मस्साजोग सह तालुक्यातील बळीराजाने केली आहे. जिल्ह्यातील राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि पुढार्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या नुसते घरात बसण्या पेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून पीकांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी मस्साजोगसह तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.
मस्साजोग महसूल मंडळामध्ये दिनांक 15/06/2025 रोजी सकाळी 6 वाजता मस्साजोग शिवारामध्ये अतिवृष्टी झाली आहे.या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने पंचनामे करून तात्काळ मदत करावी. – संदीप देशमुख शेतकरी, मस्साजोग
मागच्या दोन दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीसाठी आलेल सोयाबीनच्या शेंगा सडुन गेल्यात,तर भाजीपाला पिके मातीसोबत वाहून गेलीत यामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालंय.सरकारने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी हि शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला मागणी आहे..अरविंद थोरात. युवा शेतकरी ढाकेफळ.
मस्साजोग महसुल मंडळात काल अतिवृष्टी सद्रश्य पाऊस झाल्यामुळे सोयाबीन व कापूस ही पिके जमीन दोस्त झालेली आहेत. व शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी शासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. – श्यामसुंदर शिरसाट,शेतकरी आरंणगाव .
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पिके, जनावरे आणि घरे यांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी संकटात सापडले असून त्यांच्या पुनर्वसनाची व आर्थिक मदतीची गरज आहे. सरकारने कोणतीही अट न घालता प्रत्येक शेतकऱ्याला सरसगट नुकसान भरपाई द्यावी. – अशोक कोठावळे ,शेतकरी काळेगाव.
महसूल मंडळ केज उमरी, सावंतवाडी येथील सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी सदरील शेतकऱ्याचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत द्यावी. – गणेश सावंत मा. उपसरपंच उमरी ,सावंतवाडी.























